Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : १५ मोबाईलसह चोरटा ताब्यात; धुळे पोलिसांची कारवाई

Dhule News : घरातून महागड्या कंपनीचा मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे प्रकार

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात सध्या मोबाईल चोरीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. याच दरम्यान (Dhule) चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका सराईत मोबाईल चोरट्याला पोलिसांनी (Police) १५ मोबाईलसह ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अंबिकानगर येथून गेल्या काही दिवसांपूर्वी घरातून महागड्या कंपनीचा (Mobile) मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे प्रकार घडत असल्याने त्यांना आळा (Dhule Police) घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता चाळीसगाव रोड परिसरातील गजानन कॉलनी येथून एका मोबाईल चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जवळपास चोरी केलेले १५ नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. मोबाईल चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पुढील तपास चाळीसगाव रोड पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूर जिल्ह्यात गारपीट, फळबागेसह शेती पिकांच मोठं नुकसान

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

Kairichi Kadhi Recipe : उन्हाळ्यात करा कोकणी मेजवानी; गरमागरम भात अन् कैरीची आंबट-गोड कढी, जणू स्वर्ग सुखच

SCROLL FOR NEXT