Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून मंगलपोत तोडून पसार; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : चोरट्याने मंगल पोत गळ्यातून तोडून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना रविवारी संध्याकाळी उघडकीस आलेली होती

भूषण अहिरे

धुळे : रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगल पोत हिसकावून चोरट्याने पोबारा केला होता. दरम्यान पोलिसांनी तपास करत पश्चिम देवपूर पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याने चोरलेली तीन तोळ्याची मंगल पोत पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

धुळे (Dhule) शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अनमोलनगर येथील महिलेची चोरट्याने मंगल पोत गळ्यातून तोडून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना रविवारी संध्याकाळी उघडकीस आलेली होती. या संदर्भात सदर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दिली होती. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलिसांनी (Dhule Police) परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे व गुप्त माहिती दारा मार्फत माहिती मिळवली. 

नकाने रोडवरील छत्रपती हॉस्पिटलजवळ पांझरा नदीकिनारी चोरटा हा उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्या ठिकाणी एक संशयित त्यांना आढळून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने या चोरट्याच्या मुसक्या आवळ्याला असून त्याच्याकडून चोरलेली तीन तोळे सोन्याची मंगल पोत पोलिसांनी हस्तगत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT