धुळे : मेंढपाळ समाजासाठी वनचराई जमिनी आरक्षित केल्या असताना वनविभागाकडून जमिनीपासून दूर ठेवले जात आहे. या विरोधात ठेलारी संघटनेतर्फे निदर्शने आंदोलन केले. तसेच पुढील पंधरा दिवसात जमिनी मेंढपालनासाठी खुली केली नाही तर कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (dhule-news-thelari-sanghatna-strike-forest-department-no-land-vancharai)
मेंढपाळ समाजासाठी विभागाच्या वन चराई जमिनी प्रशासनातर्फे ठेलारी बांधवांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तरी देखील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिरीमिरीसाठी ठेलारी बांधवांना या वनराई जमिनीपासून दूर ठेवण्यात येत आहे. यामुळे वनविभागाच्या कारभाराविरोधात आक्रमक झालेल्या महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे आक्रमक भूमिका घेत वन विभागाच्या कार्यालय बाहेर निदर्शने करीत पुढील पंधरा दिवसांच्या आत ठेलारी बांधवांची हक्काची वनजमीन मेंढपालनासाठी खुली करण्यात न आल्यास वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोका आंदोलन करण्याचा संतप्त इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
दोन वर्षांपासून प्रशासनाची चालढकल
वनचराई जमिनी मेंढ्या चारण्यासाठी आरक्षित करून दिले आहेत. परंतु वन विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक लोभापाई ठेलारी बांधवांना त्यांच्या हक्काची वनचराई जमिनीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे लावण्यात आला आहे. यासंदर्भात गेल्या कित्येक वर्षांपासून ठेलारी संघटना लढा देत आहेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी याबाबत वनविभागाच्या कार्यालयाबाहेर प्रशासनाच्या व अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे मुंडन आंदोलन केले होते. तसेच गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न या संघटनेतर्फे करण्यात आला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून वन विभागातर्फे चालढकलपणा सुरू असल्यामुळे महाराष्ट्र ठेलारी महासंघ तर्फे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील पंधरा दिवसांत सकारात्मक भूमिका न घेतली गेल्यास कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.