st strike
st strike 
महाराष्ट्र

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे आई एकविराकडे साकडे

भूषण अहिरे

धुळे : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी आज धुळे (Dhule) शहरातील एकवीरा देवी मंदिरात जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. येथे सर्व कर्मचारींनी आई एकवीरा देवीकडे विलगीकरणाबाबत साकडे घातले आहे. (dhule-news-The-agitating-ST-workers-approached-Ekvira-Devi)

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे; यासाठी गेल्या महिन्याभरापासून धुळ्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर बसलेले आहेत. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून बंद असलेली एसटी सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

देवीची केली आरती

राज्य शासनाला सद्बुद्धी येवो यासाठी या सर्व आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी आज एकविरा देवी मंदिरात जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेत आरती केली आहे. तसेच या दरम्यान राज्य शासनाला लवकरात लवकर सद्बुद्धी देऊन एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेवो; असे साकडे यावेळी या सर्व एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी एकवीरा देवीकडे घातले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT