TET Exam Scam
TET Exam Scam Saam tv
महाराष्ट्र

TET Exam Scam: धुळे जिल्ह्यात ५१ शिक्षक बोगस

साम टिव्ही ब्युरो

सोनगीर (धुळे) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१९ मधील गैरप्रकार प्रकरणी राज्यातील सात हजार ८७४ उमेदवार अपात्र ठरले असून, त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करून प्रत्यक्ष नोकरी करीत असलेल्या (Teacher) शिक्षकांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठवणे व ऑगस्टपासून वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. (Dhule News Bogus TET Exam)

जानेवारी २०२० मध्ये राज्यभरात डीएड व बीएड उत्तीर्ण झालेल्यांसाठी टीईटी परीक्षा (TET Exam Scam) घेण्यात आली होती. मात्र त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर ४४७ जण राज्यात खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षणसेवक किंवा सहशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. त्यात खानदेशात तब्बल १४० बोगस शिक्षकांचा समावेश आहे. त्यापैकी (Dhule) धुळे जिल्ह्यात ५१ शिक्षक आहेत.

धुळे जिल्ह्यातील शिक्षक व शाळांची नावे अशी

गायत्री प्रकाश माळी (सर्वोदय हायस्कूल हेंद्रुण), सुमीत जयराम पाटील (न्यू इंग्लिश स्कूल नेर), अमोल बापूजी बाविस्कर (आदर्श हायस्कूल मोराणे), दीपक पंडित भोये (इंदिरा गांधी कन्या शाळा नवलनगर), भटू भरत देवरे, घनश्याम सदाशिव, दीपक पंडित देवरे, (छत्रपती शिवाजी हायस्कूल मुकटी), निखिल रामलाल शर्मा, कविता नंदकुमार पाटील, अन्सारी शाहिस्ता नासिर, विजया तुकाराम शार्दुल (कानोसा कॉन्वेन्ट धुळे), अर्चना देविदास देवरे (बाफना हायस्कूल फागणे), नीलेश जर्मा गावित (चौगाव हायस्कूल), निपिल सखाराम वळवी (शिरडाणे हायस्कूल), रेखा भाईदास पाटील (धमाणे हायस्कूल), राकेश रमेश कोळी (नूतन न्याहळोद), विपूल बाळकृष्ण शिरूडकर (आदर्श विंचूर), अतुल लोटन पाटील (नूतन बोरकुंड), ज्योती चंद्रकांत पवार (पिंपळादेवी मोहाडी), तुषार अशोक अहिरे (जयहिंद देवपूर), अब्दुल कैयाम अब्दुल समद शेख (एल. एम. सरदार धुळे), समाधान सुभाष बेलदार (कुंडाणे), जयश्री सुमेरसिंग मोरकर(जैताणे), रेखा दिनकर जाधव (धामनेर), सुनंदा युवराज दाभाडे (म्हसाळे), धोंडू भिका रखमे (न्यू इंग्लिश साक्री), दीपाली अमृत भामरे (कन्या सामोडे), अनंत ज्ञानेश्वर पाटील (केएएम पिंपळनेर), प्रवीण दगा खामगल (शारदा भदाणे), सागर मोहन राजभोज (पिंपळगाव), शेख आयाज शेख शफीयोद्दीन (उर्दू हायस्कूल), सुनीता युवराज पवार (चौधरी हिसाळे), रूपाली अशोक जाधव, दीपिका मनोज कोळी (वाघाडी), समाधान दिलीप नगराळे (बोराडी), ज्योती आत्माराम खैरनार (महात्मा फुले धुळे), हर्षल भटू पाटील (होळनांथे), राजू मोतीसिंग कुवर (खंडेलवाल, धुळे), मोनाली रतन पगारे (स्वामी विवेकानंद शिरपूर), गायत्री दीपक पाटील (आई बिजासनी शिरपूर), शेखर विश्राम बोरसे (धावडे), मयूर अरूण बोरसे, नीलेश ज्ञानेश्वर सैंदाणे (आरावे), सचिन पंढरीनाथ पवारपडावद, भटू प्रकाश धनगर, वर्षा तुकाराम पाटील (जनता चिमठाणे), शरद रामदास खलाणे(मालपूर) मंगलसिंग भिका गिरासे, दिनेश राजेसिंग ठाकरे (दादासाहेब रावल दोंडाईचा), देवयानी गोविंदराव निंबाळकर, अनिता रवींद्र देशमुख (नूतन वॉर्ड चार)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Tips : नाश्त्याला चहा-चपाती खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम तुम्हाला माहितीयेत का?

Today's Marathi News Live : लातूरच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट

MLC Elections Postponed: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली, राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निर्णय

Ravindra Dhangekar : पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकी काय आहेत कारणं?

Sattu Drink Benifits: उष्णतेपासून त्वरित आराम हवाय? 'या' पेयाचे करा सेवन

SCROLL FOR NEXT