Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगा गंभीर; तीन दिवसात दुसरी घटना

Dhule News : बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगा गंभीर; तीन दिवसात दुसरी घटना

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील बोरकुंड त्याचबरोबर मोघन परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा चांगलाच हैदोस (Leopard Attack) बघायला मिळत आहे. हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असताना वन विभागाकडून (Dhule) अद्याप कोणताच बंदोबस्त करण्यात आलेला नाही. याच दरम्यान बिबट्याने आणखी एका मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Live Marathi News)

गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील धुळे तालुक्यातील बोरकुंड शिवारात शेतातून वडिलांसोबत घरी परतत असलेल्या लहान मुलावर हल्ला केला होता. त्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील उघडकीस आली होती. त्यानंतर दोनच दिवसात त्याच परिसरामध्ये असलेल्या मोघन येथे बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलावर उपचार सुरु 

धुळे तालुक्यातील दहा वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात बालक गंभीररित्या जखमी झाला असून, त्यास तात्काळ धुळ्याच्या शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT