st strike
st strike 
महाराष्ट्र

निलंबन ऑर्डरची सामूहिक होळी; एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : राज्‍य परिवहन महामंडळ कर्मचारी संपावर आहेत. कामावर येत नसलेल्‍या कर्मचारींवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. यात धुळे (Dhule) येथे निलंबनाची ऑर्डर काढलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑर्डरची सामूहिक होळी करत प्रशासनाचा निषेध केला.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे; या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. एसटी प्रशासनातर्फे या एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून धुळे जिल्ह्यातील जवळपास ३६ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या ३६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाची ऑर्डर देण्यात आली आहे. परंतु या सर्व कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या निलंबनाच्या ऑर्डरची प्रत सामूहिकरीत्या होळी करून जाळत एसटी प्रशासनाचा व राज्यशासनाचा निषेध केला आहे.

संपातून माघारी नाहीच

कुठल्याही परिस्थितीमध्ये संप माघारी घेणार नाही अशी ठाम भूमिका या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे बघावयास मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

SCROLL FOR NEXT