MSEDCL Employee Saam tv
महाराष्ट्र

Dhule: घोषणाबाजी करून तीव्र संताप व्‍यक्‍त; वितरण कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी संप

घोषणाबाजी करून तीव्र संताप व्‍यक्‍त; वितरण कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी संप

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीतर्फे सर्वत्र आज वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप सुरू आहे. धुळे देखील साक्रीरोड येथील वीज वितरण (MSEDCL) कार्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. (dhule news Strike for demands of msedcl employee)

2021 चे विद्युत संशोधन बिलाला विरोध करीत वीज वितरण कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या सरकारच्या धोरणाचा देखील या आंदोलन कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध करीत घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कामाचा अतिरिक्‍त बोजा

सध्या वीज वितरण विभागामध्ये मोठ्या (Dhule News) प्रमाणात रिक्त पद असून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नाहीयेत आणि याउलट वरिष्ठ पदावर विराजमान असलेल्या रिक्त पदांच्या भरतीकडेच प्रशासन लक्ष देत असल्यामुळे कामाचा लोड कमी करण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढत असल्याने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती करून रिक्त पदे भरण्यात यावेत; अशी देखील मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Maharashtra Live News Update: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

SCROLL FOR NEXT