St Strike
St Strike saam tv
महाराष्ट्र

St Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्‍या हाती कटोरे; प्रवाशांकडून भीक मागत शासनाचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : प्रजासत्‍ताक दिन सर्वत्र साजरा होत असताना एसटी कर्मचारी मात्र संपावर आहेत. शासन तोडगा काढत नसल्‍याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन करून राज्य शासनाचा व एसटी प्रशासनाचा (MSRTC) निषेध केला. (dhule news st strike Bowls in the hands of ST employees Protest against begging from passengers)

राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलगीकरण करण्यात यावे; या मागणीसाठी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून धुळ्यातील आंदोलक एसटी कर्मचारी आंदोलनावर (St Strike) ठाम आहेत. त्याचबरोबर एसटी प्रशासनातर्फे या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर (St Employee) भीक मागण्याची वेळ ओढवली आहे.

हातात कटोरे घेऊन प्रवाशांकडून भीक

राज्य शासनाचा व एसटी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी धुळ्यातील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धुळे एसटी आगारामध्ये हातात कटोरे घेऊन प्रवाशांकडून भीक मागून भीक मागो आंदोलन केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी या अनोख्या पद्धतीने राज्य शासनाचा तसेच एसटी प्रशासनाचा या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. प्रवाशांनी देखील या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या कटोऱ्यात भिक टाकून या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिसाद दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Budh Gochar 2024: मे महिन्यात बुध ग्रहाचं परत एकदा परिवर्तन; ५ राशींच्या जीवनात होणार मोठी घडामोड

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

SCROLL FOR NEXT