Dhule Collector Office Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: जिल्‍हाधिकारींना भेटण्यासाठी पायरीवरच झोपली; मानसिक रुग्ण वृद्धेचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

जिल्‍हाधिकारींना भेटण्यासाठी पायरीवरच झोपली; मानसिक रुग्ण वृद्धेचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

भूषण अहिरे

धुळे : मानसिक रुग्ण असलेल्या वृद्ध महिलेने धुळे जिल्हाधिकारी (Dhule News) कार्यालयात गोंधळ घातला. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मानसिक रुग्ण असलेल्या वृद्ध महिलेने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर झोपून जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा हट्ट केला. (Maharashtra News)

आठवड्यातील पहिला दिवस असल्‍याने धुळे जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामानिमित्‍त येणाऱ्या नागरीकांची वरदळ सुरू होती. याच गर्दीत एक वृद्ध महिला देखील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात आली. तिने काही वेळातच गोंधळ घालायला सुरवात केली. जिल्‍हाधिकारी यांना भेटायचे असे म्‍हणत ती कार्यालयात जाण्याच्‍या पायरीवर झोपली. मानसिक रुग्ण असलेल्या या वृद्ध महिलेच्या हट्टीपणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

पोलिसांनी घेतले ताब्‍यात

या संदर्भातील माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत गोंधळ घालणाऱ्या या मानसिक रुग्ण असलेल्या वृद्ध महिलेस ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT