Dhule nanded News Saam tv
महाराष्ट्र

Farmer : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; शिवसैनिक उतरले रस्त्यावर, धुळ्यासह नांदेड, बुलढाण्यात आंदोलन

Dhule nanded News : नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जवळपास ३२ हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र ही मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा कडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे

Rajesh Sonwane

धुळे : मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून मदतीची अपेक्षा आहे. दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा; या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यासाठी धुळेसह नांदेड व बुलढाणा येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. 

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठाकरे गट शिवसैनिकांनी थेट मोर्चा काढत मागणी शासन दरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर शासनाला लाज नाही, त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा घनाघाती आरोप देखील यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी केला आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. 

नांदेडच्या किनवटमध्ये ढोल बजाव आंदोलन
नांदेड : राज्यासह मराठवाड्यात पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु सरकार शेतकऱ्याला तुटपुंजी मदत देत आहे. या मदतीवर शेतकऱ्यांचे काही भागणार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या मागण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सरकारला जागा करण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने किनवटमध्ये ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बुलढाण्यात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर
बुलढाणा : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जवळपास ३२ हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र ही मदत अत्यंत तोकडी असून राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमुक्ती करण्यात यावी, झालेल्या नुकसान भरपाई पोटी हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT