Shiv sena Saam tv
महाराष्ट्र

रस्‍त्‍यासाठी शिवसैनिक उतरले रस्‍त्‍यावर

रस्‍त्‍यासाठी शिवसैनिक उतरले रस्‍त्‍यावर

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यामध्ये बेहेड ते विटाई या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरती चालणाऱ्या दुचाकी धारकांचा अपघात झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. यासंदर्भात (Dhule News) संबंधित प्रशासनातर्फे रस्ता दुरुस्तीसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला. परंतु प्रशासकीय अधिकार्‍यांकडून रस्ता दुरुस्ती संदर्भात हलगर्जीपणा होत असल्याने शिवसेनेतर्फे (Shiv Sena) आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. (dhule news Shiv Sena on the road due to delay in road works)

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असताना देखील या रस्त्याचे काम अद्यापही का होत नाही. याचा जाब या धडक मोर्चाच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकारी व मोर्चात सामील झालेल्या कार्यकर्त्यांनी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांना विचारला आहे. या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले.

दहा दिवसांचा अल्‍टीमेटम

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चालढकलपणाच्‍या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र घोषणाबाजी करून या अधिकारांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दहा दिवसात या रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT