Farmer
Farmer 
महाराष्ट्र

एकीकडे मुसळधार मात्र शिंदखेडा कोरडा; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

भूषण अहिरे

धुळे : राज्यात अनेक ठिकाणी वरूण राजाने जोरदार हजेरी लावत हाहाकार माजवला आहे. यामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. तरी दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील मालपुर परिसरात पावसाने अद्यापही जोरदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने पेरलेले संपूर्ण पीक वाया गेले असून आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधूनमधून होणाऱ्या रिमझिम पावसाच्या भरोशावर शेतकऱ्याने पुन्हा एकदा दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. (dhule-news-shindkheda-taluka-no-rain-Crisis-of-double-sowing-on-farmers)

शेतकरी धास्‍तावलेले

असे असले तरी दुबार पेरणी करत असताना देखील पुढील काही दिवसांमध्ये पावसाची मेहरबानी राहील की नाही याबाबत शेतकरी धास्तावला आहे. कारण पहिले पीक वाया गेल्यानंतर आता दुबार पेरणी करत असताना दुसरे पीक तरी समाधानकारक पद्धतीने येईल की नाही याची देखील शासंका शेतकऱ्यांला वाटू लागली आहे.

तर कर्जाचा डोंगर

जर पुढील काळात देखील पावसाने मेहेरबानी केली नाही. तर शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची दाट भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी देखील यानिमित्ताने शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

Ambajogai Crime : ४८ लाख रुपयांची घरफोडी आली उघडकीस; तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात

Palghar Politics: पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार

Yamini Jadhav Meet Raj Thackeray | महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Rohit Pawar News | बारामतीत पैसे वाटले, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT