महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा तुटपुंजा पगार अन्‌ आंदोलन; परिवाराची फरफट

भूषण अहिरे

धुळे : एसटी कर्मचाऱ्यांचा तुटपुंज्या पगार व तो देखील तीन- तीन महिने वेळेवर मिळत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवर होतो. मुलाची फि भरता येत नाही, की आईच्‍या उपचारासाठी पैसे नाही. पैशांअभावी कशा पद्धतीने परिणाम होतो; ही व्यथा एसटी कर्मचाऱ्यांची असते. (dhule-news-salary-and-agitation-of-ST-employees-The-family-frenzy)

तुटपुंज्या पगारामुळे घर खर्च देखील चालवण एसटी कामगारांच्या परिवाराला कठीण जात आहे. मुलांची शाळेची फी देखील वेळेवर भरता येत नाहीये. तर दुसरीकडे आजाराने ग्रासलेल्या आई- वडिलांचा उपचार देखील करणं शक्य होत नसल्याने आजाराने ग्रासलेल्या कुटुंबियांना उपचाराविनाच डोळ्यादेखत अंथरुणात खिळत पडलेलं बघण्याशिवाय या कर्मचाऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. धुळ्यातील एसटी कर्मचारी गणेश गायकवाड यांच्या घरात देखील अशीच काहीशी परिस्थिती बघावयास मिळत आहे.

मुलाची फी भरणेही कठीण

गणेश गायकवाड हे धुळे आगारात लिपिक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या तुटपुंज्या पगारामुळे त्यांच्या कुटुंबियांना देखील मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गणेश गायकवाड यांचा एकुलता एक मुलगा परंतु त्याची शाळेची फी देखील त्यांच्याकडून भरली जात नाही. गेल्या तीन वर्षांपासून एकुलत्या एका मुलाच्या शाळेची फी देखील भरण्यास एसटी कर्मचारी गायकवाड यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे वारंवार शाळेतून फी भरण्याचा तगादा देखील लावण्यात येत आहे. अखेर संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांच्या पत्नीला देखील इतरत्र जाऊन काम करावे लागत आहे.

आईचा उपचार करायचा कसा?

गायकवाड यांचे वडील आजाराने ग्रस्त होते. परंतु तुटपुंज्या पगारामुळे त्यांचा उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे अखेर वडीलांना डोळ्यासमोर जीव सोडतांना बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी अखेर उपचाराविनाच जीव सोडला. त्यानंतर आता आईची देखील परिस्थिती काहीशी तशीच आहे. आई देखील आजारांमुळे अंथरुणात खिळत पडली आहे. परंतु आईच्या उपचारासाठी देखील या एसटी कर्मचारी मुलाकडे खिशात दमडी नसल्यामुळे आईचा देखील महागडा ईलाज करणं शक्य होत नाहीये.

अन्‌ आता आंदोलनाचा लढा

आपल्याप्रमाणेच इतर एसटी कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारची वेळ येऊ नये यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे यासाठी हा मुलगा नाविलाजाने अंथरुणात खिळत पडलेल्या आईला सोडून रात्रंदिवस संपात सामील होत आंदोलनामध्ये बसला आहे. आंदोलन मागे एसटी कर्मचाऱ्यांची एवढीच माफक इच्छा आहे; की राज्य शासनाने विलगीकरण झाल्यानंतर इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना दवाखान्याचा त्याच बरोबर इतर सर्व सुविधांचा लाभ मिळेल व त्यांचा घरच्यांची होत असलेली फरपट थांबेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Camphor Benefits: देवाला प्रसन्न करण्यासह आरोग्यासाठी कापूर आहे फायदेशीर

Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

SCROLL FOR NEXT