Manjula Gavit Saam tv
महाराष्ट्र

Dhule: आमदार मंजुळा गावित देखील नॉटरिचेबल

आमदार मंजुळा गावित देखील नॉटरिचेबल

भूषण अहिरे

धुळे : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने काल रात्रीपासून शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्‍यांच्‍यासोबत काही निकटवर्तीय देखील आहेत. यात धुळे जिल्‍ह्यातील साक्री (Sakri) मतदार संघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांचा फोन देखील नॉटरिचेबल आहेत. यामुळे आमदार गावित देखील शिंदेसोबत आहे का? याबाबत चर्चा सुरू आहे. (dhule news sakri matdar sangh MLA Manjula Gavit is also notreachable)

शिवसेनेचे (Shiv Sena) ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती आहे. सोमवारी (२० जून) विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील (Gujarat) सुरतला गेले होते. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची देखील सध्‍या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे एकटे नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय देखील असल्‍याचे सांगितले जात आहे.

गावितांची शिवसेनेची जवळीत

धुळे जिल्ह्यातील साक्री मतदार संघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा फोन देखील नॉटरिचेबल आहेत. अपक्ष आमदार मंजुळा गावित यांची सुरुवातीपासून शिवसेनेशी जवळीक असून सत्‍ता स्‍थापन करताना त्‍यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. आता शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या गटात अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा देखील समावेश आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT