Sachin Sawant Kunal Patil Saam tv
महाराष्ट्र

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Dhule News : काँग्रेस नावाच्या नदीचं सध्या शुद्धीकरण सुरू आहे. गाळ वाहून गेला असून सध्या पक्षात २४ कॅरेट सोनं उरले असल्याचे सावंत यावेळी म्हणाले. तसेच ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले

भूषण अहिरे

धुळे : अनेकजण सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. परंतु ज्यांचे मोठे साम्राज्य आहेत; ते साम्राज्य वाचवण्यासाठी आज सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन बसले असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली आहे. 

धुळे ग्रामीणचे माजी आमदार तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत हजारो कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांची जिल्हास्तरी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या काँग्रेसच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांची जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. 

आता काँग्रेसमध्ये २४ कॅरेट सोनं 

काँग्रेस नावाच्या नदीचं सध्या शुद्धीकरण सुरू आहे. गाळ वाहून गेला असून सध्या पक्षात २४ कॅरेट सोनं उरले असल्याचे सावंत यावेळी म्हणाले. तसेच ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. तेच आज त्यांच्या शेजारी जाऊन बसले आहेत. ज्यांची गरज आहे ते आमच्या सोबत आहेत. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता येणाऱ्या काळात या दिगजांचा पराभव करून त्यांना त्यांची जागा दाखवेल; असं म्हणत सचिन सावंत यांनी यावेळेस भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसची मोर्चेबांधणी 
काँग्रेसचे भक्कम नेतृत्व असलेले माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर धुळ्यात आता काँग्रेसची पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा राज्य प्रवक्ते सचिन सावंत व खासदार शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे. या आढावा बैठकीमध्ये काँग्रेसचा धुळे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यासाठी ही बैठक पार पडली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT