Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Rasta Roko : अक्कलपाडा धरणातून लोंढाणा प्रकल्पात पाणी सोडा; ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

Dhule news : प्रशासनाकडे ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन देखील मागणी केली होती.

Rajesh Sonwane

धुळे : धुळे शहर व परिसरात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे अक्कलपाडा धरण पूर्णपणे भरले असून या द्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. दरम्यान लोंढाणाला प्रकल्पात अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी नेर परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. 

धुळे (Dhule) तालुक्यातील नेर परिसरातील ग्रामस्थांनी आज रास्ता रोको करून प्रशासनाकडे लोंढाणाला प्रकल्प अक्कलपाडा धरणाच्या (Akkalpada Dam) उजव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडून भरण्याची मागणी केली आहे. यापूर्वी देखील प्रशासनाकडे ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन देखील मागणी केली होती. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर ग्रामस्थांनी रास्ता रोको करून आपला निषेध व्यक्त केला आहे, 

ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलन दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे देखील बघावयास मिळाले. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाला या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आले असून या रास्ता रोकोनंतर जर प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही, तर यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT