Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : बदलापूर घटनेचे धुळ्यात पडसाद; ऊबाठा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले निषेध आंदोलन

Dhule News : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार घटनेचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भूषण अहिरे

धुळे : बदलापूर येथे एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून धुळ्यात देखील याचे पडसाद उमटताना बघावयास मिळाले आहे. ऊबाठा शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

बदलापूर (Badlapur) येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार घटनेचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चाच्या माध्यमातून बदलापूर येथील घटनेचा निषेध ऊबाठा शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने नोंदविण्यात आला आहे. यावेळी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आरोपी नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील संतप्त आंदोलकांनी केली आहे. 


गृहमंत्री फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी 
सदर घटनेच्या निषेधार्थ मोर्चेकऱ्यांतर्फे तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चामध्ये ऊबाठा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा घटना पुन्हा वारंवार होत असून त्यांना थांबवण्यासाठी निष्क्रिय ठरत असलेल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; अशी मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात देखील संतप्त महिला आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Maharashtra News Live Update: वसई-विरारमधील तलावांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलन

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT