Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : लॉज, कॅफेवर पोलिसांची धाड; महाविद्यालयीन तरुण- तरुणी ताब्यात

Dhule News : धुळे शहरात लॉजवर अनधीकृतपणे व्यवसाय सुरु करण्यात आला होता. नागरी वस्तीत असलेल्या लॉजवर सुरु असलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्या

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात अनधीकृतपणे लॉज आणि कॅफेवर जाऊन अश्लील चाळे सुरु होते. याबाबत पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर येथे देवपूर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान कॅफेमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील चौकशी सुरु केली आहे. 

धुळे शहरात काही लॉजवर अनधीकृत पणे व्यवसाय सुरु करण्यात आला होता. नागरी वस्तीत असलेल्या या लॉजवर सुरु असलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व पालिका आयुक्तांना अधिकृत सायबरमध्ये सुरु असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. 

पोलिसांची लॉजवर धाड 

वाढत्या तक्रारींची दखल घेत कॉलेज तरुण तरुणींचे सुरू असलेले अश्लील चाळे संदर्भात दिलेली माहिती व त्यानंतर पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील काही लॉज व कॅफेवर पोलीस प्रशासनाने धाड टाकली. यादरम्यान कॅफे व लॉजमध्ये काही महाविद्यालयीन तरुण तरुणी पोलीसांना आढळून आले आहेत. 

देवपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अश्लिल चाळे करणाऱ्या तरुण तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे तसेच पालिका आयुक्त देखील उपस्थित होते. शिवाय शहरात अशा प्रकारे अनधिकृत सुरु असलेल्या कॅफेवर देखील पालिका प्रशासनातर्फे आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत आणखी एक मेट्रो धावणार! तळोजा ते खांदेश्वर, असा असणार मार्ग, स्थानके कोणती? वाचा

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

SCROLL FOR NEXT