Dhule News, Dhule Latest Marathi News  Saam tv
महाराष्ट्र

बनावट दारूचा कारखाना केला उध्वस्त

बनावट दारूचा कारखाना केला उध्वस्त

भूषण अहिरे

धुळे : बनावट दारू तयार करून या नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये ही दारू भरून विक्रीसाठी नेली जात होती. याबाबत मिळालेल्‍या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बनावट दारूचा (Liquor) कारखाना उध्वस्त केला आहे. (dhule news police Fake liquor factory destroyed)

धुळे (Dhule) तालुक्यातील चिंचवार या गावाच्या परिसरामध्ये बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या मोठ्या संख्येने पोलिसांना (Police) आढळून आल्या आहेत. या ठिकाणी बनावट दारू तयार करून या नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये ही दारू भरून विक्रीसाठी नेली जात होत्या. घटनास्थळावरून चौघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या देखील आवळल्या आहेत.

साडेचार लाखाहून अधिकच मुद्देमाल जप्‍त

सदर कारवाईत पोलिसांनी जवळपास 4 लाख 63 हजाराहून अधिकचा मुद्देमाल दारूसाठ्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला आहे, ताब्यात घेतलेल्या चौघांमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा देखील समावेश असल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT