Fraud Marriage Saam tv
महाराष्ट्र

Fraud Marriage : विवाह लावून देत फसवणूक; लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या पर्दाफाश

Dhule News : लग्नाळू मुलांचा शोध घेऊन मुलीचा शोध घेऊन लग्न लावून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशाच प्रकारे धुळ्यात एका तरुणाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

भूषण अहिरे

धुळे : विवाह इच्छुक असलेल्या लग्नाळू मुलांना गाठून लग्नाचे आमिष दाखविले जाते. लग्नासाठी मुलगी दाखवून विवाह करण्याचे सांगून लाखो रुपयांचा गंडा घालून पसार होणाऱ्या बंटी बबलीच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यासह मदत करणाऱ्या आणखी दोन मुलींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विवाहासाठी मुलीचा शोध घेत असलेल्या मुलांचा शोध घेऊन लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील एका आंतरराज्य टोळीचा चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील एका ३५ वर्षीय तरुणाला १ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालून बनावट लग्न लावल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एजंटसह तीन महिलांना अटक केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवल्याची कबुली दिली आहे. 

धुळे शहरातील पीडित तरुणाला लग्नासाठी स्थळ शोधताना एजंट सचिन मरगडे याचा संपर्क क्रमांक मिळाला होता. मरगडे याने तरुणाला काजल नावाच्या मुलीसोबत १ लाख ३० हजार रुपये घेऊन खैरनार यांचे लग्न लावून दिले. मात्र काही दिवसांतच पत्नीच्या वागणुकीवर संशय आल्याने खैरनार यांनी तिची माहिती काढली. यात ती आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. यानंतर खैरनार यांनी हुशारी दाखवत, मित्रासाठी स्थळ हवे असल्याचे भासवून एजंटला पुन्हा बोलावले.   

सापळा रचून केला पर्दाफाश 

त्यानुसार एजंट दुसऱ्या मुलीला घेऊन येताच आधीच तयारीत असलेल्या चाळीसगाव रोड पोलिसांच्या मदतीने सापळा रचून सचिन मरगडे, बनावट नवरी काजल आणि तिच्या दोन महिला साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी काही तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान चाळीसगांवरोड पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

साखरपुड्यानंतर गावी आला, तरुणाला टोळक्यांनी गाठलं, धारदार शस्त्रांनी सपासप वार, पहाटे नेमकं झालं काय?

Weight loss: वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, Weight Loss करत असाल तर या ४ चुका टाळा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ₹१५०० मिळत नाही? टेन्शन सोडा, सरकारने घेतला मोठा निर्णय; आता प्रत्येक जिल्ह्यात...

SCROLL FOR NEXT