Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाला विरोध; समता परिषदेकडून रस्त्यावर उतरत निदर्शने

भूषण अहिरे

धुळे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या (Maratha Aarkshan) मराठा आरक्षणा संदर्भातील अध्यादेशाला विरोध करण्यात आला आहे. या विरोधात (Dhule) समता परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आज रस्त्यावर उतरून निदर्शने केली. (Live Marathi News)

राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केला आहे. हा अध्यादेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी या मागणीसाठी मोठ्या संख्येने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटल्याचे (Maratha Reservation) बघावयास मिळाले आहे. यावेळी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रमुख मागण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देखील देण्यात आले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवेदनाच्या माध्यमातून मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशामध्ये सगेसोयरे हा महत्त्वपूर्ण जो उल्लेख करण्यात आला आहे. त्यास महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने विरोध दर्शवण्यात आला आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा देऊन त्यानंतर ज्या सदस्यांची निवड यावेळी करण्यात आली. यांच्यावर देखील संघटनेच्या वतीने अक्षेप नोंदविण्यात आला असून, शिंदे समिती संदर्भात देखील संघटनेच्या वतीने विरोध दर्शवत या समितीच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT