Dhule News Dhule News
महाराष्ट्र

Kanbai Utsav : धुळ्यात कानबाई विसर्जन उत्सवात घडले दुर्दैवी; विसर्जनावेळी एकाचा बुडून मृत्यू

Dhule News : खानदेशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर कानबाई उत्सव साजरा करण्यात येत असतो. दोन दिवस कानबाईचे स्थापना केल्यानंतर सोमवारी मिरवणूक काढत विसर्जन करण्यात येत असते

भूषण अहिरे

धुळे : खानदेशात साजरा होत असलेला कानबाई उत्सवात आज कानबाईची विसर्जन मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. दरम्यान या विसर्जन सोहळ्यात दुर्दैवी घटना धुळ्यात घडली असून पांझरा नदीत विसर्जनासाठी गेले असताना एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे उत्सवात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

पांझरा नदीत घडलेल्या घटनेत राजेंद्र पंडीत नेरकर (वय ६२) असे बुडालेल्या इसमाचे नाव आहे. एका दिवसाची पाहुणे असलेल्या खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई मातेला पारंपारिक सगळी खेळत निरोप देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात कानबाई मातेची पूजन झाल्यानंतर आज विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांचा गजरात आईची मिरवणूक वाढत फुगडी खेळण्याची आणखी परंपरा कायम आहे. 

त्यानुसार धुळे जिल्ह्यात कानबाई उत्सव सुरू असून आज कानबाई विसर्जन उत्सवा दरम्यान ही घटना घडली आहे. आज सकाळपासून विसर्जन मिरवणूक काढण्यात येत होत्या. त्यानुसार धुळ्यातील पांझरा नदीत विसर्जनासाठी गेले असताना राजेंद्र नेरकर हे नदीत उतरले होते. यानंतर ते नदीत बुडाले. यावेळी सोबत असलेल्या नातेवाईत तसेच नागरिकांनी शोधकार्य केले मात्र त्यांचा शोध लागला नाही. यामुळे घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. 

बचाव पथकाकडून शोध सुरु 

कानबाईचे पांझरा नदीपात्रामध्ये विसर्जन करण्यासाठी गेलेला इसम पाण्यात बुडाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांचे बचाव पथक त्याचबरोबर स्थानिकांतर्फे संबंधित इसमाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान याठिकाणी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT