Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

छगन भुजबळ अपयश पचवण्याचा प्रयत्न करताय; ॲड. वाघ यांचे प्रत्युत्तर

भूषण अहिरे

धुळे : मुंबई येथे पार पडत असलेल्या ओबीसी अधिवेशनादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी धुळ्यातील याचिकाकर्ते ॲड. राहुल वाघ यांचा उल्लेख बीजेपीचे सरचिटणीस असा म्हणून केला. यानंतर ॲड. वाघ यांनी मंत्री छगन भुजबळ हे बीजेपीसोबत माझे नाव जोडून आपले अपयश पचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. (dhule news obc reservation issue Add rahul Wagh reply in chagan bhujbal)

राज्य सरकारने जो अध्यादेश कोर्टामध्ये जारी केला होता. त्याला (Dhule) धुळ्यातील ॲड. राहुल वाघ यांनी विरोध करत त्या विरोधात याचिका दाखल केली होती. वाघ यांच्या याचिकेचा विचार करून न्यायालयाने राज्य सरकारचा ओबीसी आरक्षण संदर्भातील अध्यादेश फेटाळून लावला होता. मध्यप्रदेश सरकारने कार्यतत्परता दाखवत ओबीसी आरक्षणासाठी असलेल्या त्रुटी दूर करीत ओबीसी आरक्षण मिळवले. परंतु महाराष्ट्र सरकार अद्यापही ओबीसी आरक्षण संदर्भात फक्त अपयश पचवण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसून येत असल्याचा टोला देखील याचिकाकर्ते ॲड. राहुल वाघ यांनी राज्य सरकारवर लावला आहे.

तर ओबीसींना आरक्षणाचा लाभ

राज्य सरकारने ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी जर मनापासून प्रयत्न केला; तर नक्कीच महाराष्ट्रातील ओबीसींना देखील आरक्षणाचा लाभ घेता येईल, असे देखील याचिकाकर्ते वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

SCROLL FOR NEXT