महाराष्ट्र

परिचारिकांवरील लेखाविरोधात धुळ्यात परिचारिका संघटना आक्रमक

परिचारिकांवरील लेखाविरोधात धुळ्यात परिचारिका संघटना आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : बीड जिल्ह्यातील एका वर्तमानपत्रामध्ये परिचारिका संदर्भात लज्जास्पद लेख प्रकाशित केला होता. या विरोधात परिचारिका संघटना आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या विरोधात धुळे येथे परिचारीका संघटनेच्यावतीने निदर्शने केली. (dhule-news-nurses-association-in-Dhule-is-aggressive-against-the-article-on-nurses)

धुळ्यातील जिल्हा रुग्णालय येथील सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्यावतीने धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर बीड येथील वृत्तपत्राच्या संपादक व बातमी संबंधातील इतर कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत या वृत्तपत्रामध्ये परिचारिकांविषयी केलेल्या लिखाणाचा निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला आहे.

काम बंदचा इशारा

त्याचबरोबर संबंधित प्रशासनाने पुढील काळात याची दखल घेतली नाही; तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचारिका संघटना एकत्रित येत जनआंदोलन छेडत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या परिचारिकांनी दिला आहे. यावेळी संतप्त निदर्शनकर्त्या परिचारिकांनी परिचारिका विरोधामध्ये लेख लिहिणार्‍या वृत्तपत्राच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT