Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

धुळ्यातील मुस्लिम धर्मगुरूंनी भोंग्यांबाबत घेतला सकारात्मक निर्णय

भूषण अहिरे

धुळे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 तारखेपासून मशिदीवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या आवाहनानंतर धुळ्यामध्ये या संदर्भात मुस्लिम संघटनांतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे (Dhule News) पालन करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांतर्फे घेण्यात आला आहे. (dhule news Muslim clerics in Dhule take positive decision on bhonga)

मुस्लिम संघटनांतर्फे झालेल्‍या बैठकीत सकाळी पाच वाजता होणारी आजान ही भोंग्यानविना करण्याचा निर्णय मुस्लिम धर्मगुरूंतर्फे घेण्यात आला आहे. तसेच दिवसभरातील होणारे अजानदेखील न्यायालयाच्या आदेशानुसार पंचावन्न डेसिबलपेक्षा कमी आवाजात ठेवण्याचा निर्णय मुस्लिम धर्मगुरुंतर्फे घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या मशिदीवरील लागलेले भोंग्यासंदर्भात अद्यापही स्थानिक पोलिसांकडून (Police) परवानगी घेण्यात आली नाही. त्यांच्या संदर्भात देखील पुढील दोन ते तीन दिवसात सर्व परवानग्या घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय हा मुस्लिम धर्मगुरुंतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या राज्यभरामध्ये भोंग्यांच्या वादावर सकारात्मक भूमिका मुस्लिम धर्मगुरुंतर्फे धुळ्यात घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

Raju Patil News : आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही, राजू पाटील यांचा महायुतीला इशारा?

Summer Skin Care: या घरगुती उपायांनी होईल काळी त्वचा गोरी

Heat Wave in Maharashtra : मे महिना 'ताप'दायक ठरणार, राज्यात उष्णतेची लाट येणार

Andheri Fire: ब्रेकिंग! अंधेरी पंप परिसरात भीषण अग्रितांडव; दारूचे दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT