Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : धोकादायक इमारतींना पालिका प्रशासनातर्फे नोटीस; धुळे शहरात ११० धोकेदायक इमारती

Dhule News : धुळे शहरासह मनपा हद्दवाढीच्या गावात जीर्ण धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या इमारती पाडणे आवश्यक आहे

भूषण अहिरे

धुळे : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अशा परिस्थितीमध्ये धुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी हि प्रक्रिया राबविली जाते. मात्र इमारती रिकाम्या केल्या जात नाही. आता पुन्हा अशा इमारतींचा सर्व्हे करून महापालिका प्रशासनाकडून नोटीस वाजविण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

धुळे शहरासह मनपा हद्दवाढीच्या गावात जीर्ण धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या इमारती पाडणे आवश्यक आहे. पण अद्यापही महापालिकेतर्फे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने धोकेदायक असलेल्या इमारतींच्या मालकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटीस देण्याचा सोपस्कर केला जातो आहे. 

दरवर्षी दिल्या जातात नोटीस 

पावसाळा सुरु होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी धोकेदायक इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात येत असते. सव्हेंक्षण झाल्यानंतर त्या इमारत मालकांना इमारत खाली करण्याबाबत नोटीस बजावल्या जातात. अर्थात दरवर्षी हि प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र या इमारती खाली केल्या जात नसल्याचे पाहण्यास मिळते. यातून काही दुर्घटना देखील घडल्या आहेत. 

११० धोकेदायक इमारती 

दरम्यान पालिका प्रशासनाने या धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या धोकादायक इमारतींच्या बाहेर नोटीसा देखील लावण्यास सुरुवात केली असून पावसाळा दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये; यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून पालिका प्रशासनातर्फे पूर्वनियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरासह हद्दवाढीच्या भागात जवळपास ११० धोकादायक इमारती आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Gaurav More Wedding : हास्यजत्रा फेम गौरव मोरेची बायको आहे तरी कोण?

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT