Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: संपामुळे ४० हून अधिक शस्त्रक्रिया लोटल्‍या पुढे; धुळे वैद्यकिय महाविद्यालयाने घेतला भरतीबाबत निर्णय

संपामुळे ४० हून अधिक शस्त्रक्रिया लोटल्‍या पुढे; धुळे वैद्यकिय महाविद्यालयाने घेतला भरतीबाबत निर्णय

भूषण अहिरे

धुळे : संपामुळे धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण वाढला आहे. यामुळे रुग्णांचे (Dhule News) देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तीन दिवसात जवळपास ४० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याला पर्याय म्हणून आता संपावर गेलेल्या परिचारिकांच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

जुनी पेन्शन योजना लागू करावी; यासाठी राज्यभरातील आरोग्य कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत. या संपाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर देखील होताना दिसून येत आहे. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये (Medical College) उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर देखील याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. धुळ्यात देखील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून या रुग्णालयामध्ये उपचारासाठी रुग्ण दाखल होत असतात. परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संप पुकारला आहे. या संपामध्ये परिचारिका देखील सहभागी झाल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये परिचारिका विना रुग्णांचे उपचार होत आहेत.

कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती

रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आल्याचे देखील बघावयास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ तीन दिवसात चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून याला पर्याय म्हणून आता हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती करून रुग्णांना सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी पद्धतीने परिचारिका भरती राबवून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली,पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम | VIDEO

ITR Filling Deadline: उरले शेवटचे काही तास! डेडलाइननंतरही फाइल करता येणार आयटीआर; कसं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

Honeymoonसाठी भारतातील बेस्ट लोकेशन, पाहताच क्षणी जोडीदार होईल खुश

Shahid Kapoor : शाहिद कपूरच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक; सोशल मीडियावर जोरदार चर्चा, रिलीजसाठी निवडला खास दिवस

SCROLL FOR NEXT