Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

सायबर गुन्ह्यातील २० लाखांवर रक्कम परत

सायबर गुन्ह्यातील २० लाखांवर रक्कम परत

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळे सायबर पोलिस स्टेशनला २०२१ पासून प्राप्त ६३ तक्रारींमधून एकूण २० लाख ७५ हजार रुपयांची रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत मिळवून देण्यात यश मिळाले आहे अशी माहिती जिल्हा पोलिस (Police) प्रशासनाने दिली. दरम्यान, नागरिकांनी अपराध झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास त्यांनी ऑनलाइन भरलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते. मात्र, उशीर झाल्यास तशी शक्यता कमी होते. म्हणून त्वरित संपर्क करणे आवश्यक असल्याचेही जिल्हा पोलिस दल व धुळे (Dhule) सायबर पोलिस स्टेशनने म्हटले आहे. (dhule news Money back over Rs 20 lakh for cyber crime)

विद्यार्थी, बेरोजगार नोकरी किंवा काम मिळविण्यासाठी गूगल सर्च इंजिनवर चाचपणी करत असतात. मात्र, सायबर (Cyber Crime) गुन्हेगारांनी गूगलसारख्या शोध यंत्रापर्यंत आपले जाळे विणले आहे. त्यामुळे गूगल सर्च अ‍ॅक्टीव्हीटी तसेच मोबाइल क्रमांक सायबर गुन्हेगारांना प्राप्त होते. परिणामी जॉब शोधणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून व्हॉटसअ‍ॅप क्रमांक, ई-मेल नोटिफिकेशन दूरध्वनीद्वारे लिंक पाठवून विस्तृत माहिती भरण्यास सांगितली जाते. संबंधितांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व छायाचित्र मागविले जाते. कुठल्यातरी स्कीमचे आमिष दाखवून तुम्ही एवढे पैसे भरले की तुम्हाला एवढे पैसे मिळतील असे सांगून प्रथम थोडे पैसे भरण्यास सांगण्यात येते. नंतर त्याचे दुप्पट पैसे रिफंड करतात. दुसऱयावेळी मात्र मोठी रक्कम भरण्यास सांगतात व नंतर प्रतिसाद देत नाहीत. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात येते. त्यामुळे

ही काळजी घ्या

कोणत्याही जॉबसाठी, नोकरीसाठी नागरिकांनी ऑनलाइन पैसे भरू नयेत, ओटीपी शेअर करून किंवा अ‍ॅनी डेस्क अ‍ॅप कधीही डाऊनलोड करू नये आणि स्वत:ची होणारी फसवणूक टाळावी असे आवाहन सायबर पोलिस (Cyber Police) स्टेशन व जिल्हा पोलिस दलाने केले आहे. सायबर अपराध झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस स्टेशनला अथवा सायबर पोलिस स्टेशन धुळे येथे संपर्क साधावा. आपली तकार www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावी असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

Apple Maps Privacy: यूजर्ससाठी प्रायव्हसी धोका! Apple Maps तुमचे लोकेशन ट्रॅक करत आहे, 'ही' सेटिंग लगेच बंद करा

SCROLL FOR NEXT