Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: आमदार फारुक शहा यांचा वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव

आमदार फारुक शहा यांचा वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव

भूषण अहिरे

धुळे: धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे आमदार फारुक शहा यांच्यासह नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी (Dhule) वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. (Dhule News MSEDCL)

वीज वितरण (MSEDCL) अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कामचूकारपणामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी वीज वितरण अधिकाऱ्यांना कळवून देखील कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नसून रोजच पाच– सहा तास वीज नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वीज वितरण कार्यालयात फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी फोन रिसीव करत नसल्याने याबाबत धुळे (Dhule News) शहराचे आमदार फारुक शहा यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली.

तर खुर्चीला बांधून काळ फासणार

आज आमदार फारुक शहा यांच्या उपस्थितीमध्ये साक्रीरोड येथील मुख्य वीज वितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार फारुक शहा यांनी संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. पुढील 24 तासाच्या आत संपूर्ण शहरातील वीज कनेक्शन सुरळीत सुरू झाले नाही. तर कार्यालयात खुर्चीला बांधून तोंडाला काळे फासण्याचा सज्जड दमच यावेळी आमदार फारुक शहा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांसह एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार फारुक शहा यांच्यासह उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT