धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या दिघावे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे उघडकीस आले आहे. बिबट्याचा रात्रीच्या वेळी होत असलेला वावर शेतकऱ्याने (Farmer) मोबाईलमध्ये व्हीडीओ करत कैद केला. (dhule news Leopard roaming in the suburbs Farmer video shoot in mobile)
परिसरात अन्य पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिघावे येथील शेतकऱ्याच्या शेतात गोठ्याजवळ रोज बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात आले होते. यामुळे ते जाळी असलेल्या गोठ्यात रात्रीच्यावेळी थांबले होते. यावेळी बिबट्या देखील आला. त्यांनी स्वतः आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) बिबट्याचा व्हिडिओ केला आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना वीज उपलब्ध असल्याने (Dhule News) पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जाताना आता या बिबट्याच्या मुक्त संचारमुळे भीती वाटत आहे. आता तरी पिंपळनेर वन विभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे; अशी मागणी दिघावे गावातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.