Tapi River Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda News : कॉलेजची बॅग, आधारकार्ड पुलावर ठेवून तरुणीची तापी नदीत उडी

Dhule News : कॉलेजची बॅग व आधार कार्ड तसेच चप्पल असे साहित्य गिधाडे येथील तापी पुलावर पडलेले असल्याचा निरोप तिचे काका प्रमोद लोहार यांना मिळाला

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील महाविद्यालयीन तरूणीने गिधाडे (ता.शिरपूर) (Dhule) येथील तापी नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना २४ डिसेंबरला घडली. (Shindkheda) शिंदखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू्ची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील गायत्री तुळशीदास लोहार (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गायत्री हिने कॉलेजची बॅग व आधार कार्ड तसेच चप्पल असे साहित्य गिधाडे येथील तापी पुलावर (Tapi River) पडलेले असल्याचा निरोप तिचे काका प्रमोद लोहार यांना मिळाला. यानंतर गावातील तुळशीदास बागले, संजय देसले, गिरीश देसले असे काहीजण तापी पुलावर जावुन खात्री केली असता सदर वस्तु गायत्री हिचे असल्याचे लक्षात आले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर सावळदे येथील पोहणाऱ्यांनी गायत्रीचा तापी नदीच्या पाण्यात शोध घेतला असता गायत्री ही तापी नदीच्या पाण्यात मिळुन आली. तिचा मृतदेह बाहेर काढुन शिंदखेडा येथील ग्रामिण रुग्णालय नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी मृत घोषीत केले.  घटनेची खबर तीचे काका प्रमोद काशीनाथ लोहार यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यू्ची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT