भुसंपादीत जमिनी 
महाराष्ट्र

भुसंपादीत जमिनीचा मोबदला मिळेना; ग्रामस्‍थांनी काम पाडले बंद

भुसंपादीत जमिनीचा मोबदला मिळेना; ग्रामस्‍थांनी काम पाडले बंद

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील बाबरे, वेल्हाने, कुंडाने येथील भूसंपादीत झालेल्या जमिनीच्या निवाडा दुरूस्‍तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी काम बंद पाडून आंदोलन केले. (dhule-news-Land-acquisition-did-not-get-compensation-The-villagers-stopped-work)

सुलवाडे- जामफळ- कनोली धरणाचे सध्या काम सुरू आहे. या धरणासाठी धुळे (Dhule) तालुक्यातील बाबरे, वेल्हाणे तसेच कुंडाणे परिसरातील शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतजमिनी या प्रकल्पामध्ये प्रशासनातर्फे अधिग्रहीत (Land acquisition) करण्यात आल्‍या आहेत. परंतु या प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे योग्य मोबदला दिला जात नाही, आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन या प्रकल्पाचे काम बंद करून त्याठिकाणी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे.

मोबदल्‍यात हव्‍या जमिनी

शेतकऱ्यांच्या प्रकल्पासाठी गेलेल्या शेत जमिनीचा मोबदल्यामध्ये धरणाच्याच जवळपास पाच किलोमीटर अंतरावर जमिनी प्रशासनातर्फे देण्यात याव्यात; अशी मागणी या शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांतर्फे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील प्रशासनाच्या विरोधात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT