जयंत पाटील 
महाराष्ट्र

ईडी आणि इन्कम टॅक्स भाजप सरकार चालवतेय; जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा

ईडी आणि इन्कम टॅक्स भाजप सरकार चालवतेय; जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा

भूषण अहिरे

धुळे : देशात आणि राज्यात भाजपा शेतकऱ्यांवर कसा अन्याय करत आहे. आपली फसवणूक करणाऱ्या सरकार केंद्रात बसले असून देशातील ईडी आणि इन्कम टॅक्स भाजप सरकार चालवत असल्‍याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा धुळ्यात भाजपावर केला आहे. (dhule-news-jayant-patil-statement-centeral-goverment-ed-and-income-tax)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ठेलारी समाजाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

फसवणूक करणारे सरकार केंद्रात

देशात आणि राज्यात भाजपा शेतकऱ्यांवर कसा अन्याय करत आहे. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना कसा चिरडले जाते हे आपण पाहिले. शेतकऱ्यांना चिडणाऱ्या मंत्राच्या मुलाला पकडण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात. मात्र एवढी मोठी घटना होऊन देखील देशाच्या पंतप्रधानांनी साधी खंत देखील व्यक्त केली नाही. आपली फसवणूक करणाऱ्या सरकार केंद्रात बसले असून या देशातील इन्कम टॅक्स भाजपा सरकार चालवत आहे; असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर दहावेळा धाड टाकून देखील त्यांना काय मिळाले याचा देखील खुलासा करावा; असे आवाहनच जयंत पाटील यांनी यावेळी केले.

कोरोना लस मोफत नाहीच : मुंडे

भारतीय जनता पार्टी शेतकरी आणि शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांना समूळ नष्ट करण्याचे काम करत आहे. वाढत्या इंधन दरवाढीचा खापर पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वतःच्या सरकारवर फोडलं असून कोरोनाची लस मोफत दिली म्हणून पेट्रोल दरवाढ करण्यात आल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले. मात्र शंभर रुपये दराने पेट्रोल घेणाऱ्यांना कितीला पडली याचा विचार करावा असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT