Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा हिट अँड रनचा थरार; दोन जखमी

धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा हिट अँड रनचा थरार; दोन जखमी

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या (Dhule News) दरम्यान मद्यपी टँकर चालकाचा हिट अँड रनचा थरार बघावयास मिळाला. कार, रिक्षा तसेच दुचाकींना धडक (Accident) दिली. तसेच दोन जणांना देखील उडवले आहे. (Maharashtra News)

गुजरातकडे जाणाऱ्या टँकर चालकाने अचानक धुळे शहरातील संतोषी माता मंदिर परिसरापासून फाशीफुल परिसरापर्यंत रस्त्यात उभ्या असलेल्या चार चाकी त्याचबरोबर रीक्षा व दुचाकीला चिरडत दोन जणांना देखील उडवले. दारूच्या नशेत हा सर्व प्रकार टँकर चालकाने केला असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती पोलीस (Dhule Police) प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मद्यपी टँकर चालकाला ताब्‍यात घेतले आहे. धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात विविध अफवा पसरू लागल्याने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT