Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी; गुजरातमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी

आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी; गुजरातमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी

साम टिव्ही ब्युरो

धुळे : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील चारही आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी केली आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्वतः पिंपळनेर पोलिस (Police) हद्दीतील एका नाक्यावर जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी तपासणी मोहिमेत दारू, गांजा, गावठी कट्टाही जप्त केला आहे. (Maharashtra News)

गुजरात (Gujrat) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातला जोडणाऱ्या जिल्ह्याच्या सीमांवर कसून तपासणी करण्यात येत आहे. गुजरातमधील ३९ संशयित जिल्ह्यात (Dhule News) आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस (Dhule Police) सतर्क झाले आहे. जिल्हा पोलिसांनी गुजरातमधील चार वॉन्टेड आरोपींना ताब्यातही घेतले आहे. तपासणी मोहिमेत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीची दारू, गांजा, गावठी कट्टा जप्त केला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी आत्तापर्यंत १६३ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

पोलिसांची चोवीस तास नजर

गुजरातला जोडणाऱ्या पिंपळनेर (ता. साक्री) लगतच्या ओटाबारी, झाकराबारी व मोहळगाव या तीन तसेच बिजासन घाट (ता. शिरपूर) या सीमांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गुजरामधील मतदारांना भुलविण्यासाठी सीमांवरून दारू, मादक पदार्थ, अवैध शस्त्र तसेच रोकड ने-आण होऊ शकते अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलिस सीमांवर चोवीस तास नजर ठेवून आहेत. स्वतः पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी शनिवारी (ता.२६) पिंपळनेरच्या सीमा नाक्यावर जाऊन पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: पुणे विद्यापीठाचा बोगस डिग्री घोटाळा 'साम टीव्ही'नं केला उघड; रिपोर्टर सागर आव्हाडांच्या धाडसाचं होतंय कौतुक

Maharashtra News Live Update: DCM सुनेत्रा पवारांची बैठक सुरू असतानाच विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Saturday Horoscope : मनात राग ठेवू नका, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Water Intake: वय, वजन आणि ऋतूनुसार बदलते पाण्याची गरज; जाणून घ्या दिवसभरात किती पाणी प्यावं?

PM-किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT