महाराष्ट्र

ग्रामसेवकाचा सही देण्यास नकार; भरती प्रक्रियेत अडचणी

ग्रामसेवक सही देण्यास नकार; भरती प्रक्रियेत अडचणी

साम टिव्ही ब्युरो

नेर (धुळे) : येथील तरुण विद्यार्थी पोलिस, सैन्य दल भरतीची तयारी करीत आहे. भरती प्रक्रियेच्या प्रवेश अर्जावर प्रशासकीय पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी अनिवार्य असते. यात पोलिस पाटील, सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरी, शिक्यानिशी रहिवासी असल्याचा पुरवा इतर कागदपत्रांसोबत द्यावा लागतो. परंतु ग्रामसेवक प्रवेश अर्जावर स्वाक्षरी देण्यास नकार देत असल्याने भरती प्रक्रियेतून वंचित राहण्याचे वेळ येणार असल्याची तक्रार विद्यार्थिनी हेमाक्षी गवळे, रिया निकुंभे, वैष्णवी खैरनार यांनी केली आहे. (dhule-news-Gramsevak-refuses-to-sign-Difficulties-in-the-recruitment-process)

येथील विद्यार्थ्यांनी गावालगत असलेल्या महामार्गावर वीज विद्युत उपकेंद्रातील निवासस्थानात स्वखर्चातून वर्गणीच्या माध्यमातून वाचनालयाची उभारणी केली. रोज विद्यार्थी वाचनालयात जाऊन अभ्यास करतात. यातून राजकीय वर्तुळातील मंडळीने याचा थोडा विचार करावा. वाचनालय उभारून गावासाठी, तरुणांसाठी प्रयत्न करावा अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे.

विद्यार्थ्यांनी जावे कोठे

गावातील रहिवासी, तसेच विद्यार्थ्यावर गुन्हा असल्याची पूर्तता करण्यासाठी प्रवेश अर्जावर गावातील सरपंच, पोलिसपाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षऱ्या असलेला अर्ज ग्राह्य धरला जातो. त्यावर सरपंच, पोलिस पाटील, तलाठी यांची स्वाक्षरी, शिक्के तात्काळ मिळत आहेत. परंतु ग्रामसेवक मात्र या कागदावर स्वाक्षरी, शिक्का देण्यास नकार देत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता असल्याने संबंधितांनी विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा; वाल्मीक कराडच्या समर्थकाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल|VIDEO

Sangamner News : तुम्ही ४० वर्षे काही केले नाही, आता तरी काम करू द्या; राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा अपघात, लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानंतर काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Beed Crime: शाळकरी मुलीला कारमध्ये कोंबलं, विनयभंग करत बेदम मारलं; बीडमधील भयंकर घटना

Yogesh Kadam: अनिल परब अर्धवट वकील; रामदास कदम यांचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT