Gautami Patil Saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil Father: गौतमी पाटीलचे वडील आढळले दयनीय अवस्थेत; रस्त्याच्या कडेला पडले होते बेशुद्धावस्थेत

Dhule News : गौतमी पाटीलचे वडील आढळले दयनीय अवस्थेत; रस्त्याच्या कडेला पडले होते बेशुद्धावस्थेत

भूषण अहिरे

धुळे : गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील हे धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरत बायपास रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. सामाजिक कार्यकर्त्यांना ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

सुरत बायपास रस्त्यावर अज्ञात व्यक्ती मृताअवस्थेत पडलेला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. या माहितीवरून सामाजिक कार्यकर्ते सदर व्यक्ती जवळ पोहोचले. त्यांना हळुवार श्वास सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ या व्यक्तीस शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. परंतु ही व्यक्ती कोण? याबाबत कुठलीही माहिती न घेता या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना थेट शासकीय हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

सोशल मीडियावर फोटो सेंड केल्यानंतर पटली ओळख 

त्यानंतर सदर व्यक्ती कोण यासंदर्भात माहिती घेण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फोटो व पोस्ट व्हायरल केला असता त्यानंतर संबंधित व्यक्ती हे गौतमी पाटीलचे वडील असल्याचे समोर आले. गौतमी पाटीलच्या वडिलांची अशी दयनीय अवस्था समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर हिरे वैद्यकीय शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panic Attack Remedies : पॅनिक अटॅक आल्यावर घाबरू नका, पटकन करा 'हा' उपाय

Maharashtra News Live Update: हडपसरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप; गांधी चौकात रात्री घडला थरार

Thane : ठाण्यात बिबट्याची दहशत! वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला; व्हिडिओ व्हायरल

Vijay thalapathy: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांनी घेतली शपथ; वडिलांना अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडिओ

Mothers Day Saree Gifts: 'मदर्स डे' निमित्त आईला गिफ्ट द्या सुंदर साड्या, 'या' 10 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT