एटीएम कार्ड 
महाराष्ट्र

एटीएम कार्ड हातचालाखिने क्लोनिंग करून फसवणुक; चौघांना घेतले ताब्‍यात

एटीएम कार्ड हातचालाखिने क्लोनिंग करून फसवणुक; चौघांना घेतले ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी एटीएम क्लोनिंग करून त्याचबरोबर हातचलाखीने एटीएम बदलून लाखोंचा गंडा घालणाऱ्या चौघा गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. (dhule-news-Fraudulently-cloning-ATM-cards-The-four-were-taken-into-custody)

धुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात एटीएमचे क्लोनिंग करून त्याचबरोबर हातचलाखीने लाखोंचा गंडा घालण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला या तपासा संदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्रे फिरवली असता, गुप्त माहितीदारा मार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की हरियाणा पासिंगच्या कारमध्ये चार संशयित संशयास्पद धुळ्याच्या दिशेने निघाले आहेत.

साडेनऊ लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चाळीसगाव चौफुली या ठिकाणी सदर कार अडवून त्यातील चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता एटीएम चोरीमध्ये या चौघांचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती उघडकीस आली आहे. चौघांकडून तब्बल नऊ लाख ५९ हजार तीनशे रुपयांच्या मुद्देमालासह ६६ वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड पोलिसांना आढळून आले आहे. पुढील तपास कामासाठी या 4 ही गुन्हेगारांचा ताबा हा देवपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT