Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Rasta Roko : तीन वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम; पुलाचे काम लवकर मार्गी लावाण्याच्या मागणीसाठी रास्तारोको

Shindkheda news तीन वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम; पुलाचे काम लवकर मार्गी लावाण्याच्या मागणीसाठी रास्तारोको

भूषण अहिरे

धुळे : रेल्वे उड्डाण पुलाचे काम मागील तब्बल तीन वर्षांपासून सुरु आहे. सादर उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू (Dhule News) असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल संतप्त नागरिकांनी आज रास्ता रोको केला आहे. (Breaking Marathi News)

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे रस्त्यावरील रेल्वे गेटवरून उड्डाण पुल केला जात आहे. या उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने काम सुरू (Shindkheda) आहे. नागरिकांना दर १५ ते २० मिनिटानंतर फाटक रेल्वे प्रशासनातर्फे बंद करण्यात येत असल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दर पंधरा ते वीस मिनिटांनंतर तब्बल अर्धा अर्धा तास वाहन घेऊन ताटकळत उभे राहावे लागते. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

तर रेल रोको 

उड्डाणपुलाचे धीम्या गतीने सुरू असलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अन्यथा १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी प्रशासनाच्या विरोधामध्ये रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा ठाकरेगट शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोच्या दरम्यान दिला आहे. या संदर्भात शिंदखेडा अपर तहसील अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT