Dhule Fire Saam tv
महाराष्ट्र

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

Dhule News : धुळे शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या ८० फूट रोड परिसरात असलेल्या लाकडाच्या वखारीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील ८० फुटी रोड परिसरातील लाकडाची वखार व जुन्या फर्निचरच्या (Dhule) गोडाऊनला अचानक आग लागली आहे. या (Fire) आगीत वखारील संपूर्ण लाकूड जळून राख झाली आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

धुळे शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या ८० फूट रोड परिसरात असलेल्या लाकडाच्या वखारीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने लागलीच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धावपळ सुरु झाली होती. वखारीतून धूर निघत असल्याचे दिसताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण लाकूड असल्याने आग विझली नाही. यानंतर अग्निशमन विभागाला (Fire Brigade) आगीची माहिती देण्यात आली. जवळपास पाच ते सहा अग्निशमन बाबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अद्याप बहुतांश प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले असून अद्यापही आग विझवण्याचे काम सुरू आहे.

आगीचे कारण अस्पष्ट 
वखारीला आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या आगीत वखारीत असलेले लाकूड जळून गेले आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT