Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: तब्बल किलो वजनाचा मुतखडा; धुळ्यात यशस्वी शस्त्रक्रिया

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात डॉक्टरांना भारतातील सर्वात मोठ्या मुतखड्यावरचे ऑपरेशन करण्यात यश आले आहे, 980 ग्रॅम वजनाचा व 12 सेंटीमीटरपेक्षा मोठा (Dhule News) असलेल्या मुतखड्याचा ऑपरेशन करून त्याला बाहेर काढण्यात डॉ. आशिष पाटील यांना व त्यांच्या टीमला यश आले आहे. इंडिया बुक व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या सर्वात मोठ्या मुतखड्याची नोंद देखील करण्यात आली आहे. (Dhule Today News)

आतापर्यंत मुतखड्याचा सर्वात मोठा आकार किती असल्याचं बघितलं आहे. पाच- दहा ग्रॅम किंवा जास्तीत जास्त 100 ग्रॅम, परंतु, तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल धुळ्यात (dhule) एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याच्या पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून 980 ग्रॅम वजनाचा व जवळपास 12 सेंटीमीटर पेक्षाही मोठ्या आकाराचा मुतखडा यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे.

अनेक ठिकाणी केले उपचार

रमण चौरे या नंदुरबार येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याला गेल्या काही दिवसांपासून लघवीचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू होता, यावर त्यांनी बहुतांश ठिकाणी उपचार देखील घेतले. परंतु कुठल्याही प्रकारे आराम वाटत नसल्याने अखेर रमण चौरे यांनी धुळ्यातील डॉक्टर आशिष पाटील यांच्याशी संपर्क केला, त्यानंतर डॉक्टर आशिष पाटील यांनी मुतखड्याशी संबंधित सर्व चाचण्या करून घेतल्या, त्यात त्यांना रमण चौरे यांच्या पोटात मोठ्या आकाराचा मुतखडा असल्याचे लक्षात आले, डॉक्टर आशिष पाटील व त्यांच्या टीमला हा मुतखडा बाहेर काढण्यात यश आले आहे.

गोळा पाहून बसला धक्का

शस्त्रक्रिया झाल्यानंतर या मुतखड्याचे वजन व आकार पाहून स्वतः डॉक्टर देखील थक्क झाले, आता या मुतखड्याची दखल इंडिया बुक व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे, आणि भारतातील सर्वात मोठा मुतखडा म्हणून मान्यता देखील देण्यात आली आहे, त्यामुळे पोटाच दुखण दुर्लक्षित करणे आपल्या जीवावर देखील बेतू शकतं हेच या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून डॉक्टर आशिष पाटील यांनी पोटदुखीने त्रस्त असल्या रुग्णांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

SCROLL FOR NEXT