Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: शिरपूर तालुक्यात गांज्याची शेती उद्‌ध्वस्त; २३६ किलो गांजाची झाडे जप्‍त

शिरपूर तालुक्यात गांज्याची शेती उद्‌ध्वस्त; २३६ किलो गांजाची झाडे जप्‍त

भूषण अहिरे

धुळे : शिरपुर तालुक्यात धुळे एलसीबीने पोलिसांच्या मदतीने गांजा शेती उद्धस्त केली आहे. या संदर्भात शिरपूर (Shirpur) तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा तपास देखील शिरपूर तालुका पोलिसांतर्फे (Shirpur Police) करण्यात येत आहे. (Letest Marathi News)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात इतर पिकाच्या आडून गांज्याची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने शिरपूर तालुका पोलिसांना सोबत घेत तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात छापा टाकला. पोलिसांना पाहून संशयीताने शेतातून पळ काढला.

७ लाखाचा गांजा

पथकाने शेताची पाहणी केली असता शेतात ३ ते ५ फूट उंच वाढलेली गांज्याची झाडे आढळून आली आहेत. पोलीस पथकाने ७ लाख ८ हजार ६० रुपये किंमतीचे जवळपास २३६ किलो २० ग्रॅम वजनाची गांज्याची झाडे जप्त केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT