Dhule News Saam tv
महाराष्ट्र

उत्‍सवावर विरजण; एकुलत्या एक नैतिकचा मृत्यू, कानूबाई विसर्जनावेळी घटना

विसर्जनावेळी नदीपात्रातील बंधाऱ्यावर पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

लामकानी (धुळे) : तीन वर्षांनंतर जुनवणे (ता. धुळे) गावात कानबाईचे रोट साजरे होत असताना शेवटच्या क्षणी नैतिकच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. येथील नैतिक कमलेश पाटील (वय १३) या मुलाचा कानूबाई विसर्जनादरम्यान नदीपात्रातील बंधाऱ्यात पाय घसरून बुडून (Death) मृत्यू झाला. नैतिक कुटुंबाचा एकुलता मुलगा होता. (Dhule News Child Death)

जुनवणे गावात दोन दिवसांपासून कानूबाईच्या उत्सवामुळे आनंदाचे वातावरण होते. कानूबाई विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर जवळील नदी पात्रातील बंधाऱ्यात विसर्जन झाल्यानंतर नैतिक नदीजवळ पाण्यात पाय घसरून बंधाऱ्यात बुडू लागला. या वेळी काठावर असलेल्या अनेकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. गावातील पन्नासपेक्षा जास्त तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र तलावातील गाळामध्ये तो फसल्याने त्याला काढणे अशक्य झाले.

बांध कोरल्‍यानंतर सापडला मृतदेह

जेसीबीच्या सहाय्याने मातीचा बांध कोरण्यात आला, पाणी कमी झाल्यावर नैतिकचा शोध लागला, त्याला तातडीने धुळे येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नैतिकचे वडील कमलेश सुभाष पाटील शेतकरी आहेत. नैतिक बोरकुंड येथील मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत होता. तो वडिलांना शेतीकामातही नेहमीच मदत करत असे. त्याला एक मोठी बहीण रितू, आई व आजी असा परिवार आहे. कानूबाईच्या उत्सवासाठी त्याने आईला घराच्या स्वच्छतेत मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT