Dhule News Saam tv
महाराष्ट्र

वीज पडून जनावरांचा मृत्यू; वाऱ्याने विजेचे खांब कोसळले

वीज पडून जनावरांचा मृत्यू; वाऱ्या विद्युत पोल झाले जमीनदोस्त

भूषण अहिरे

धुळे : मान्‍सुनचे आगमन होत असताना अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा बसत आहे. शनिवारी देखील जिल्‍ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात मोठे नुकसान झाले आहे. वीज पडून जनावरे दगावली असून, वाऱ्यामुळे विद्युत पोल पडले आहेत. तसेच विद्युत डिपी पडल्‍याने विद्युत पुरवठा (Dhule News) खंडीत झाला आहे. (dhule news Death of animals by lightning wind became an electric pole)

साक्री (Sakri) तालुक्यात शनिवारी संध्याकाळी मुसळधार व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे (Rain) तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय वीज पडून दोन गाई व एका वासराचा तसेच दोन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वाऱ्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युतपोल जमीनदोस्त झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

पंचनामा सुरू

वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे पशु पालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे यासंदर्भात पंचनामा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

Kidney Health: किडनी खराब होऊ नये म्हणून जीवनशैलीत आजच करा हे 7 महत्त्वाचे बदल

पावसाळ्यात खा गावरान स्टाईल दिंड्याची भाजी; घरी बनवण्याची रेसिपी एकदम सोपी

Koel Mallick Resign : ३ महिन्यांपूर्वीच शपथ, आता राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका

crime : भूलतज्ज्ञाची अपार्टमेंटमध्येच निर्घृण हत्या, ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी; डॉक्टर पत्नीच्या कृत्याने खळबळ

SCROLL FOR NEXT