corona positive 
महाराष्ट्र

लंडनहून धुळ्यात आलेल्‍या महिला डॉक्‍टर कोरोना पॉझिटीव्‍ह; ओमायक्रॉनची तपासणी

लंडनहून धुळ्यात आलेल्‍या महिला डॉक्‍टर कोरोना पॉझिटीव्‍ह; ओमायक्रॉनची तपासणी

भूषण अहिरे

धुळे : विदेशातून भारत नागरीक येत आहेत. त्‍यांची तपासणी केली जात आहे. यात लंडनहून (London) धुळ्यात परतलेल्या महिला डॉक्‍टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे धुळे (Dhule) आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. यंत्रणेकडून ओमायक्रॉनच्‍या अनुषंगाने तपासणी केली जात आहे. (dhule-news-Corona-Positive-a-female-doctor-from-London-Omycron-test-dhule-health-department)

धुळ्यात लंडनहून परतलेल्या महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे धुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. लंडनहून परतलेली ३८ वर्षीय महिला डॉक्टर आहे. त्यांचे सात दिवसांपूर्वीचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही महिला लंडनहून धुळ्यात २९ नोव्हेंबरला परतली आहे. त्यांना येऊन १४ दिवस उलटल्यानंतर त्यांनी खाजगी लॅबमध्ये त्यांची कोरोना तपासणी केली असता काल रात्री उशिरा त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

ओमायक्रॉनची तपासणी

आरोग्य यंत्रणेकडून यांच्याशी संपर्क साधून त्यांचे ओमायक्रॉनच्या तपासणीसाठीचे नमुने घेण्यात येत आहेत. लवकरच ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर पुढील चाचणी केली जाणार आहे. सध्या त्या महिलेला राहत्या घरातच होमक्‍वारंटाईन करण्यात आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT