Theft 
महाराष्ट्र

चोरी करताना चोरट्याला रंगेहात पकडले; नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

चोरी करताना चोरट्याला रंगेहात पकडले; नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

भूषण अहिरे

धुळे : चाळीसगाव रोड परिसरातील जामचामळा परिसरात अल खैर शाळेसमोर आज पहाटे चार ते पाचच्या सुमारास पीओपी काम करणार्‍या मजुराच्या घरात घुसून चोरी करताना चोरट्याला घरमालकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलीस ठाण्यात घर मालक सगीर रफिक शहा यांच्यातर्फे माहिती देण्यात आली आहे. तसेच चोराला चाळीसगाव रोड पोलिसांच्या स्वाधीन देखील करण्यात आले आहे.

चाळीसगाव रोड परिसरात जामचामळा या परिसरात सगीर रफिक शहा हे पीओपी काम करणारे मजूर राहतात. यांच्या घरी आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास घराच्या दरवाज्यावरची जाळी कापून एका चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. चोरीच्या प्रयत्नात असताना घरात असलेले घर मालक सगीर रफिक शहा यांना चोराची चाहूल लागली.

चोराला दोरीने बांधले

त्यांनी मोठ्या धाडसाने चोराला चोरी करताना रंगेहात पकडले. हे समजताच घराच्या बाहेर पहारा देत असलेला दुसरा चोर पसार झाला आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्याला चाळीसगाव रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला

Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

IND vs SA: आता तरी जिंकूदे! टॉस जिंकण्यासाठी केएल राहुलने वापरला खास टोटका, तरीही पदरी निराशाच; पाहा नाण्यासोबत कर्णधाराने काय केलं?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच मोठा झटका, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Bhendi Curry Recipe: हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ग्रेव्ही कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT