Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : घरफोडी करणारे सराईत ताब्यात; दागिन्यांसह ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Dhule News : धुळे शहरात घडलेल्या घरफोडीच्या घटना समोर आल्या होत्या, या अनुषंगाने आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. या तक्रारीच्या अनुषंगाने घरफोडी झालेल्या घटनांचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला देण्यात आले होते

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी घटनेचा तपास करताना चोरट्याने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

धुळे शहरात घडलेल्या घरफोडीच्या घटना समोर आल्या होत्या, या अनुषंगाने आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. या तक्रारीच्या अनुषंगाने घरफोडी झालेल्या घटनांचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला देण्यात आले होते. या नंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता या घरफोडीची उकल करण्यात यश आले. यात एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या आहेत.  

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून जवळपास ८० हजार ५०० रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. या सराईत चोरट्याच्या विरोधामध्ये धुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी देखील त्यावर चोरी तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे तसेच आझाद नगर पोलिसांतर्फे पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT