Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime: घरफोडी करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात; ३५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Dhule News : धुळे देवपूर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाली होती. या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोडीची घटना उघडकिस (Dhule) आली होती. पोलिसांकडून याचा तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

धुळे देवपूर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाली होती. या संदर्भात देवपूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली. यानंतर पोलीसानी विटभट्टी परिसरातील तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे, त्यापैकी (Dhule LCB) दोन चोरटे हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

चोरट्यांकडून जवळपास ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तांबे पितळाचे भांडे देखील असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या चोरट्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह देवपूर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT