Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

राष्‍ट्रवादी हा कुठलाही व्हिजन नसलेला पक्ष; भाजप प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा

भूषण अहिरे

धुळे : शरद पवार यांच्या कार्यक्रमात अजिनो शान शहंशाह या गाण्यावरून झालेल्या टीके संदर्भात बोलताना बावनकुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष हा दृष्टीकरणावरूनच टिकून असल्याचे म्हणत राष्ट्रवादी पक्ष हा कुठलाही व्हिजन नसलेला पक्ष आहे. (NCP) राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेत्यांनी तयार केलेली कुडी असून नेता गेला की राष्ट्रवादी गेली असं म्हणत राष्ट्रवादीवर देखील निशाणा बावनकुळे यांनी साधला आहे. (Dhule News Chandrashekhar Bavankule)

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आज धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. या पत्रकार परिषदे दरम्यान बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) चांगलाच निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफुस असून ती वेळोवेळी समोर येत आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍या नाराजी नाट्यानंतर जर कोणी भाजपमध्ये येऊ इच्छुक असेल तर भाजपचा दुपट्टा नेहमीच तयार असतो आणि याबाबत कुठल्याही प्रकारची अट घातली जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरेंवर साधला निशाणा

याकूब मेमन यांच्या कबर सौंदर्यीकरण यावर बोलत असताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील लावला असून, प्रत्येक मोठ्या घटनेची माहिती गृह विभागाला दिले जात असते. मग एवढ्या मोठ्या प्रकरणाची माहिती गृहमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना मिळाली नव्हती का? असा प्रश्न यावेळी बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटातील उमेदवारांची जबाबदारीही भाजपवर

शिंदे गटातील उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी देणार का? यावर बोलताना बावनकुळे यांनी शिंदे गटातील कुठल्याही उमेदवाराला भाजपच्या चिन्हावर उमेदवारी देणार नसून एकनाथ शिंदे यांनी निश्चित केलेल्या भाजप शिंदे गट उमेदवारास पूर्ण ताकदीने निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपवर देखील असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर बोलताना बावनकुळे यांनी पंकजा मुंडे भाजपवर नाराज नसून पंकजा मुंडे यांनी कुठेही अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले नसून भाजपचे पूर्णपणे ते काम करत आहेत असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक येथील आदिवासी बाळ विक्री प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी या प्रकरणाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याची पूर्णतः काळजी यापुढे शिंदे व फडणवीस सरकार घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये आदिवासी विकास व सामाजिक कल्याण विभागाचा निधी हा जाणीवपूर्वक वापरला जात नव्हता व अखेरीस पडून असलेला निधी हा पूर्णतः इतर विभागात जाणीवपूर्वक वळवला जात असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT